Skip to main content

नंदुर - मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

नंदुर - मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

परिचय

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याजवळ नंदुर - मधमेश्वर धरणाच्या उथळ पाण्यात हे पक्षी अभयारण्य अस्तित्वात आहे. 'महाराष्ट्राचे भरतपूर' म्हणून ओळखले जाणारे हे अभयारण्य वर्षभर स्थानिक व स्थलांतरित पक्षांना आश्रय देते म्हणूनच ते खरोखरच एक पक्षी नंदनवन आहे. १९०६ ते १९१३ मध्ये नंदुर -मधमेश्वर  येथे कोतवा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर दगडाची भिंत बांधली गेली जेणेकरून पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवता येईल. नंदुर -मधमेश्वर  तलाव गंगापूर व दारणा जलाशयातून सोडलेले पाणी साठवते. त्यामुळे वर्षभर पाण्याच्या पातळीत चढ उतार होत असते. प्रवाहासोबत वाहून येणाऱ्या वाळू, रेती, दगड व इतर सेंद्रिय पदार्थ तलावामध्ये सातत्याने साचले आहे ज्यामुळे त्या परिसरात अनेक लहान बेटं तयार झाली आहेत. येथे अनेक उथळ पाण्याचे तलाव आहे ज्यामुळे जैविक समृद्धी त्या प्रभागाला लाभली आहे, स्थलांतर करणाऱ्या पक्षांकरिता  मेजवानी ठरते. असंख्य पक्षांना आश्रय देण्यासाठी जलाशयात भरपूर प्रमाणात जलचर व वनस्पती आणि पुरेशी जागा उत्तम परिस्थिती प्रदान करते.

आकर्षण : धार्मिक/ प्राकृतिक /ऐतिहासिक स्थळे:

२७ जानेवारी २०२० रोजी पार पाडलेल्या 'इंटरनॅशनल रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स' या  अधिवेशनात भारत देशातील १० राज्यांसोबतच महाराष्ट्राच्या पदरात देखील एक रामसर वेटलँड मिळाले आहे, ते म्हणजे नंदुर -मधमेश्वर अभयारण्य. देशातील इतर नावाजले गेलेले वेटलँड म्हणजे केशोपुर-मायानी, बियास कॉन्सर्व्हेशन रिसर्व  आणि पंजाबमधील नांगल, उत्तर प्रदेशातील नावाबगंज, आग्र्यातील पार्वती, सामन, समसपूर, उत्तरप्रदेशातील सांडी आणि सरसाई नवार या सर्व वेटलँड्स चा अधिवेशन दरम्यान जाहीर झालेल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आर्द्रभूमीचे संरक्षण करण्याच्या हेतूने १९७१ साली ९० देशांसोबत रामसर कन्व्हेशन अधिकृती करणाचा करार करण्यात आला होता. तेव्हापासुन आतापर्यंत भारतातील ३७ पाणथळ, जलाशय, वेटलँड्स ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे व पक्षी संवर्धन हेतू महत्वाचे म्हणून घोषित केले गेले आहे. आंतराष्ट्रीय यादीत नंदुर -मधमेश्वर २४१० स्थानी आहे.

थिंग्स टू डू:
पक्षी अभयारण्याचे क्षेत्रफळ एकूण १०० चौ. किमी असून त्याचा १७.६५० चौ.किमी चा भाग अतिसंरक्षित म्हणून आखल्या गेला आहे, जेथे रहिवासी आणि स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात जमतात. हे पक्षी अभयारण्य सर्व पक्षी प्रजातींसाठी महत्वाचे अधिवास म्हणून सिद्ध होत आहे. ज्याला इंटरनॅशनल युनिअन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर चा दर्जा देखील प्राप्त आहे.
गजपंथ जैन सिद्धक्षेत्र मंदिर- दिगंबर व चमार लेणी हि मंदिर अभ्यारण्यापासून ३. ५५ किमी अंतरावर वसलेली आहे, जवळच श्री कार्तिक स्वामी मंदिर आणि बाल रूपात असलेले येशूंचे तीर्थस्थान आहे.
भारताचे पहिले आणि एकमेव खनिज, दगड आणि जीवाश्म संग्रहालय अभयारण्य पासून फक्त ४.७ किमी अंतरावर आहे आणि ते  पर्यटकांसाठी  महत्त्वाचे  स्थळ आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्रम्ब्यकेश्वराचे महादेव मंदिर येथून ६६. ८ किमी आहे. आणि NH ८४८ औरंगाबाद नाशिक महामार्गावरून केवळ १ तास ३१ मिनिटात पोहोचता येते.
या प्रदेशाच्या जवळचा सर्वात महत्वाचा डोंगर  म्हणजे अंजनेरी पठार आहे. हा ब्रह्मगिरी, त्र्यंबक आणि अंजनेरी या महत्त्वाच्या हिंदू तीर्थक्षेत्राचा भाग आहे. हे  हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते आणि पठाराच्या शिखरावर त्याची आई अंजनी हिला समर्पित मंदिर देखील बांधले गेले आहे. अनेक लहान जलाशयांसह धबधबे व नाले याच पठारावरून उगम पावतात, ज्यात अप्पर वैतरणा धरणाचा देखील समावेश आहे. हेराक्लियम, ट्रायकोलेपिस, ब्लूमिया, सेलोसिया, स्मिथिया, सेनेसिओ इत्यादी सारख्या औषधी वनस्पती येथे आढळतात म्हणूनच हा प्रदेश वनविभागाने वनौषधी संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, व त्याला अतिरिक्त संरक्षण देखील दिले आहे.
येथील मंदिरे, संग्रहालये आणि सभोवतालच्या हिरव्या घनदाट जंगला व्यतिरिक्त जलाशयातील पाणीसाठा वाढल्यावर या क्षेत्राचे विहंगम दृश्य पर्यटनासाठी उत्तम ठरते.
फ्लोरा:
सुमारे ४६० प्रजातींच्या वनस्पतींपैकी ८० प्रजाती जलीय आहे. अभयारण्य खरोखरच जैवविविधतेचे आकर्षण केंद्र आहे. अभयारण्याच्या सभोवताली बाभूळ,चिंच,जांभूळ, कडुलिंब,महारुख,पांगारा व निलगिरी इत्यादी वृक्षांची लागवड केली जाते. तर जलाशयाच्या उतरत्या भागात गहू,ज्वारी,ऊस व इत्यादी भाजीपाल्याची लागवड केली जाते.
फोना:
या अभयारण्यात सुमारे ८० स्थलांतर करणाऱ्या पक्षी प्रजातींचे अस्तित्व आहे, ज्यात स्पुनबिल स्टोर्क, लेसर फ्लेमिंगो, ग्लॉसी आयवीस, ब्राम्हणी डक, मलार्ड  डक, नॉर्दन शॉव्हलर, गॉडवीट्स, पोचर्ड्स इत्यादी पक्षांचा समावेश आहे. येथे स्थानिक पक्षांच्या सुमारे २३० प्रजाती आहे ज्यामध्ये स्पॉटबिल डक, गरुड, पाणकोंबडी, धनेश पक्षी, मोर, तितर बाटर,व इत्यादी पक्षांचा समावेश आहे.
या अभयारण्यामध्ये अनेक दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्यजीव वनस्पतींना आश्रय दिला आहे. ज्यामध्ये भारतीय चंदन, इंडियन स्पॉटेड ईगल, ईस्टर्न इम्पेरिअल ईगल, ग्रिस्टिल्ड ग्रास बर्ड, व्हाईट रम्पड वल्चर, ईजिप्शियन वल्चर व देवळाली मिनौ मासा आणि बिबट सारख्या मोठ्या सस्तन प्राण्यांचे संरक्षण करते.

नांदूर-मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध जरी असले तरी येथे वन्य प्राण्यांचे दर्शन देखील होते. जसे कि मसन्या उद, फिशिंग कॅट, ऑटर्स, खोकड, लांडगे, बिबट, अस्वल इत्यादींची नोंद आहे. अनेक सरीसृप देखील येथे आढळतात.
जलाशयात २४ प्रजातींचे मासे आढळतात ज्यात प्रामुख्याने बटर फिश, कॅट फिश, देवळाली मिनौ, स्लेन्डर रासबोरा, नोवाकुला, रेझर बिलीमिनौ आणि जागतिकरित्या धोक्याच्या पातळीवर असलेली शालिनी बार्ब येथे आढळतात.

Best time to visit/ भेटीची उत्तम वेळ:
हा परिसर नाशिकच्या अगदी जवळ असल्याने थोडेसे दमट वातावरण कायमस्वरूपी असते. ऑकटोम्बर दरम्यान तापमानात थोडीशी वाढ झाल्यास नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान गुलाबी थंडीचा आस्वाद घेतला जाऊ शकतो. दिवसाचे सर्वात उष्ण तापमान २८% जरी असले तरी रात्रीच्या सुमारास ते १०% व त्याच्या खालती देखील जाते.

पॅकेजेस:

येथे कसे पोहोचाल/ नकाशा:

हवाईमार्ग/ Airways:
अभयारण्यापासून सगळ्यात जवळचे नाशिक विमानतळ केवळ ३४. ४  किमी असून औरंगाबाद विमानतळ १८० किमी अंतरावर आहे.

रेल्वे मार्ग:
मुंबई भुसावळ रेल्वे मार्गावर स्थित निफाड रेल्वेस्टेशन अभयारण्यापासून केवळ १२ किमी अंतरावर आहे.

रस्ते मार्ग:
अभयारण्यास निफाड, नाशिक आणि सिन्नर मार्गे सहज जाता येते.

  • सहा वर्षापेक्षा खालील वयोगटाला प्रवेश फुकट आहे,  ६ ते १२ वर्ष वयोगटाला १० रु प्रवेश शुल्क आहे,  १२ वर्षांपुढील वयोगटाला २० रु प्रवेश शुल्क आहे.
  • वाहन प्रवेश शुल्क: २ चाकी १५ रु, चार चाकी ५०रु, ६ चाकी ७५रु

Local Assistance/ स्थानिक सहाय्य्यता: